25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसेनेला मोठा धक्का; रामदास कदम राजीनामा देणार

शिवसेनेला मोठा धक्का; रामदास कदम राजीनामा देणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता गमावलेल्या शिवसेनेला आणखी एक मोठा झटका बसणार आहे. माजी विरोधी पक्षनेते आणि मंत्री रामदास कदम लवकरच पक्षाचा राजीनामा देणार आहे. रामदास कदम काही वेळातच उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी राजीनामा पाठवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ते शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देणार आहे. याआधी कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश एकनाथ शिंदे कॅम्पमध्येच दाखल झाले होते.

रामदास कदम हे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेतेही राहिले आहे. त्यांना देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्री करण्यात आले होते. रामदास कदम यांचा मुलगा योगेश दापोलीतून आमदार आहे. एकनाथ शिंदे यांना पांिठबा देणा-या गुवाहाटीला पोहोचलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये त्यांचा समावेश होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या