21.5 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमराठवाडाजालना पोलिसांसमोर मोठं आव्हान : पीपीई किट आणि मास्क घालून चोरी

जालना पोलिसांसमोर मोठं आव्हान : पीपीई किट आणि मास्क घालून चोरी

एकमत ऑनलाईन

समृद्धी ग्राहक सेवा केंद्राचे शटर फोडून 22 हजार रुपयांवर डल्ला : घटना सीसीटीव्हीमध्ये कैद 

जालना : लॉकडाऊन सुरू असताना मध्य रात्री चोरट्यांनी पिपीई किट आणि मास्क बांधून एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. शिवाजी पुतळा परिसरात चोरट्यांनी एका खाजगी कंपनीचे एटीएम आणि बँकिंग ग्राहक सेवा केंद्राचे एटीएम फोड्याचा प्रयत्न केला. मात्र एटीएम मशीन उघडत नसल्याने जवळच असलेल्या समृद्धी ग्राहक सेवा केंद्राचे शटर फोडून 22 हजार रुपयांवर डल्ला मारल्याची घटना देखील उघडकीस आली आहे.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने खळबळ उडाली असून चोरट्यांना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. या प्रकरणी समृद्धी ग्राहक सेवा केद्र संचालकांच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read More  नियोजित ट्रामा केअर व जलशुद्धीकरण प्रकल्पाची आमदार धिरज देशमुख यांच्याकडून पाहणी

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या