24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयस्टीलच्या दरात मोठी घट, चार महिन्यात प्रतिटन २० हजारांची घसरण

स्टीलच्या दरात मोठी घट, चार महिन्यात प्रतिटन २० हजारांची घसरण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : वाढत्या महागाईने सर्वसामान्यांसह व्यावसायिकांचीही चिंता वाढवली होती. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे महागाईचा भडका उडाला होता. युद्धामुळे मागणी आणि पुरवठा साखळीवर या युद्धाचा परिणाम झाला होता. युद्धाला सहा महिने उलटल्यानंतर ही जागतिक व्यापाराला बसलेली झळ काही प्रमाणात कमी झाली आहे. जगातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाल्याची चिन्हे दिसत आहे.

महागाईला काही प्रमाणात आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजनांचा परिणाम दिसू लागला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बांधकामासाठी लागणा-या स्टीलच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मागील चार महिन्यात स्टीलचे दर प्रतिटन २० हजार रुपयांनी घसरले आहेत.

बांधकामासाठी लागणा-या स्टीलचे दर चार महिन्यानंतर घसरल्याने बांधकाम खर्च कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मार्च महिन्यात ८५ हजार रुपये प्रतिटन असलेलेले स्टील २० हजारांनी कमी झाले आहेत. सध्या स्टीलचा दर ६५ हजार रुपये प्रतिटन इतका आला आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे मार्च महिन्यात स्टीलचे दर आजवरच्या सर्वात उच्चांकी म्हणजेच ८५ हजार रुपये प्रति टनावरती पोहोचले होते. त्यानंतर आता स्टीलच्या दरात घसरण दिसून येत आहे.

स्टीलच्या निर्यातीवर केंद्र सरकारने करात वाढ केली होती. त्याचा परिणाम निर्यातीवर झाल्याचे दिसून आले आहे. निर्यातीवरील शुल्कामुळे परदेशात जाणारे स्टील महागले. त्याशिवाय काही स्टील उत्पादकांनी निर्यातदेखील कमी केली. स्टीलला मागणी अत्यल्प आहे. त्याचा परिणामही स्टीलच्या दरावर झाला असल्याचे म्हटले जाते.

दरम्यान, एकीकडे स्टीलला असलेली कमी मागणी आणि दुसरीकडे कच्या मालाचे भाव जैसे थे असल्याने स्टील उद्योजकांनी उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. येणारे काही महिने स्टीलच्या दरात आणखी कपात होणार नसल्याचे म्हटले जात आहे. आधीच स्टील उत्पादकांना मोठा फटका बसला असल्याने त्यांना तोटा सहन करावा लागत आहे. मागील एक-दोन महिन्यापासून स्टील उद्योजकांनी उत्पादनात कपात केली आहे. दिवाळीच्या सुमारास बांधकाम क्षेत्रासह इतर क्षेत्रातून पुन्हा मागणी पूर्ववत होईल आणि स्टीलची मागणी वाढेल अशी अपेक्षा स्टील उद्योजकांना असल्याचे पोलाद ग्रुपचे सहसंचालक नितीन काबरा यांनी म्हटले.

केंद्र सरकारने निर्यात शुल्कात वाढ केल्याने भारताचा निर्यातीमधील प्रमाण कमी झाले. ब-याच उद्योजकांनी आपले उत्पादन कमी केले. केंद्राकडून निर्यात शुल्क कमी होईल, अशी अपेक्षा आहे. दिवाळीनंतर स्टील उद्योगाला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या