22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रबटाटा आणि टोमॅटोच्या दरात मोठी घसरण; शेतक-यांना बसतोय फटका

बटाटा आणि टोमॅटोच्या दरात मोठी घसरण; शेतक-यांना बसतोय फटका

एकमत ऑनलाईन

मुंबई : सध्या बाजारात बटाटा आणि टोमॅटोच्या दरात चांगलीच घसरण झाल्याचे दिसत आहे. बटाट्याच्या दरात ३० टक्क्यांची तर टोमॅटोच्या दरात २० टक्क्यांची घट झाल्याची माहिती व्यापा-यांनी दिली आहे. दर कमी झाल्याचा मोठा फटका शेतक-यांना बसत आहे. बटाटा व्यापा-यांनी चांगल्या भावाच्या अपेक्षेने पीक रोखून धरले होते, परंतु तसे झाले नाही. व्यापा-यांना साठा सोडण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे किमतींवर परिणाम झाला आहे. तर यावर्षी टोमॅटोचे उत्पादन चांगले झाले असताना दर खाली आले आहेत.

दरम्यान, पंधरवड्यापूर्वी घाऊक बाजारात एक किलो बटाट्याची किंमत २० रुपये होती. ती आता १४ ते १६ रुपये प्रति किलोपर्यंत घसरल्याची माहिती व्यापा-यांनी दिली आहे. किमती कमी झाल्यामुळे शेतक-यांना मोठा फटका बसत आहे. त्याचा परिणाम किरकोळ बाजारावरही जाणवत आहे.

तिथे किमती २५ ते ३० टक्क्यांनी घसरल्या आहेत. बटाटा आणि टोमॅटोच्या पुरवठ्यात वाढ झाली आहे. पुरवठा सुधारल्याने किमती घसरल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, किमती आणखी वाढतील असे वाटल्याने व्यापा-यांनी स्टॉक रोखून धरला होता. मात्र, अलीकडच्या काही महिन्यांत बटाट्याचे भाव स्थिर राहिले होते. त्यामुळे किमती आणखी वाढणार नाहीत, असे समजल्यानेच व्यापा-यांनी बटाटा विक्रीसाठी बाहेर काढला आहे.

दर उतरल्यामुळे माल खरेदीचे प्रमाण कमी
यावर्षी देशातील बटाटा पिकाचे उत्पादन ५३.५८ दशलक्ष टनांवर गेले आहे. ते मागील वर्षीच्या तुलनेत ३० लाख टन कमी आहे. सध्या बटाटा आणि टोमॅटोचा पुरवठा देखील वाढला आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव २० रुपये प्रति किलोवरून १५ रुपये प्रति किलोपर्यंत घसरले आहेत. टोमॅटो विकण्यासाठी शेतक-यांना खरेदीदार सापडत नाहीत. कारण दर उतरल्यामुळे व्यापा-यांनी देखील खरेदी कमी केल्याची माहिती मिळत आहे. जगाच्या एकूण टोमॅटो उत्पादनाचा विचार केला तर भारताचा वाटा हा १० टक्के एवढा आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या