36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeउद्योगजगतमॅन्युफॅक्­चरिंग क्षेत्रात मोठी वाढ

मॅन्युफॅक्­चरिंग क्षेत्रात मोठी वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : डिसेंबर महिन्यात कारखान्यातील उत्पादकता वाढली आहे. डिसेंबर महिन्यातील मॅन्युफॅक्­चरिंग क्षेत्राचा पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्­स म्हणजे पीएमआय तब्बल ५६.४ टक्के झाला आहे. हा निर्देशांक ५०च्या वर असल्यानंतर हे क्षेत्र विस्तारत असल्याचे समजले जाते. सध्या हा निर्देशांक ५० पेक्षा कितीतरी अंकांनी पुढे गेला आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये मॅन्युफॅक्­चरिंग क्षेत्राचा पीएमआय ५६.३ टक्के होता. सतत दोन महिने हा निर्देशांक ५६ टक्क्यांच्या वर आहे, तर गेल्या पाच महिन्यांपासून हा निर्देशांक ५० अंकाच्या पुढे आहे. ही बाब हे क्षेत्र वाढीच्या स्थितीत असल्याचे खात्रीने सांगत आहे.

ही आकडेवारी सकारात्मक आहे. मॅन्युफॅक्­चरिंग क्षेत्र पूर्णपणे पूर्वपदावर येत असल्याची लक्षणे यातून स्पष्ट दिसून येतात. त्यामुळे जीएसटी संकलन गेल्या काही महिन्यापासून वाढत असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. केवळ मॅन्युफॅक्­चरिंग क्षेत्राचे उत्पादन वाढत नाही तर या उत्पादनाला बाजारपेठेतून पुरेशी मागणी असल्याचे दिसून येते. जागतिक बाजारातूनही भारतीय कंपन्यांकडे येत असलेल्या आॅर्डरचे प्रमाण वाढत असल्याचे हा निर्देशांक तयार करणाºया संस्थेने म्हटले आहे.

मात्र अजूनही रोजगार निर्मिती पूर्वपदावर आलेले नाही. ती लवकरच येण्याची शक्­यता आहे. पहिल्या तिमाहीपेक्षा दुसºया तिमाहीतील आकडेवारी सकारात्मक होती. आता तिसºया तिमाहीतील आकडेवारीही सकारात्मक होण्याची शक्­यता असल्याचे दिसून येते. लवकरच सेवाक्षेत्राचा निर्देशांक जाहीर होणार आहे. त्यावरून दोन्ही क्षेत्राचा अंदाज येऊ शकणार आहे. नाही तर या उत्पादनाला बाजारपेठेतून पुरेशी मागण्यात असल्याचे दिसून येते. जागतिक बाजारातूनही भारतीय कंपन्यांकडे येत असलेल्या आॅर्डरचे प्रमाण वाढत असल्याचे हा निर्देशांक तयार करणाºया संस्थेने म्हटले आहे.

मात्र अजूनही रोजगार निर्मिती पूर्वपदावर आलेले नाही. ती लवकरच येण्याची शक्­यता आहे. पहिल्या तिमाहीपेक्षा दुसºया तिमाहीतील आकडेवारी सकारात्मक होती. आता तिसºया तिमाहीतील आकडेवारीही सकारात्मक होण्याची शक्­यता असल्याचे दिसून येते. लवकरच सेवाक्षेत्राचा निर्देशांक जाहीर होणार आहे. त्यावरून दोन्ही क्षेत्राचा अंदाज येऊ शकणार आहे.

कोरोनामुळे लिपस्टिकच्या मागणीत घट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या