23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeआंतरराष्ट्रीयअफगाणिस्तान सीमेवर मोठ्या हालचाली?

अफगाणिस्तान सीमेवर मोठ्या हालचाली?

एकमत ऑनलाईन

मॉस्को : अफगाणिस्तानच्या भूभागावर गेल्या महिन्याभरापासून तालिबान्यांनी बंदुकीच्या जोरावर कब्जा केला आहे. तालिबान्यांनी पंजशीरवर सुद्धा हल्ला करून ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आता इसीसचा अफगाणिस्तानवर डोळा असल्याने रशियाने अफगाणिस्तानला गंभीर इशारा दिला आहे. तर रशिया अफगाणिस्तानात पुन्हा आपले सैनिकी कारवाई करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तान सीमेवर मोठ्या हालचाली होत असल्याचे दिसून येत आहे.

अफगाणिस्तानातील तालिबान्यांच्या भीतीमुळे ताजिकिस्तानातील सैन्य तळांवर सुसज्ज रणगाडे पाठवण्याची घोषणा रशियाने केली आहे. तसेच मध्य आशियातील बहुतांश देश तालिबान्यांच्या दहशतीमुळे भीतीच्या छायेखाली आहेत. अफगाणिस्तानात पुन्हा तालिबानी सत्ता आल्याने पुन्हा दहशतवादी हल्ले वाढण्याची शक्यता असल्याचे रशियाने सांगितले आहे.

सीमेवर १० हजार पेक्षा जास्त दहशतवादी
रशियाच्या सेक्युरिटी कांऊन्सिलचे डेप्यूटी चेअरमन दमित्री मेदवेदेव यांनी एक लेख लिहताना म्हटले आहे की, गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार मध्य आशियाई देशांच्या लागून असलेल्या अफगाणिस्तानच्या सीमेवर १० हजार पेक्षा जास्त दहशतवाद्यांसह त्यांचा पाठलाग करणारे लोक ठाण मांडून बसले आहेत. इसीसला या अन्य देशांमध्ये वर्चस्व मिळवायचे आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या