मुंबई : पगारवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचा-यांसाठी आनंदाची बातमी आहे. चालू वर्षात जवळपास सर्वच क्षेत्रातील कर्मचा-यांचा पगार वाढण्याची शक्यता आहे. टीमलीजच्या जॉब्स अँण्ड सॅलरी प्राईम रिपोर्ट २०२१-२२ अनुसार गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत या वर्षी जवळपास सर्वच क्षेत्रातील कंपन्या आपल्या कर्मचा-यांच्या पगारात वाढ करू शकतात. या वर्षी जवळपास सर्वच कर्मचा-यांच्या पगारात वाढ होईल, मात्र ही पगारवाढ मर्यादीत असेल. या वर्षी सॅलरीमध्ये ८.१३ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, असे देखील या अहवालामध्ये म्हटले आहे.
विविध १७ व्यवसायिक क्षेत्रांचा अभ्यास करून हा अहवाल बनवण्यात आला आहे. हा अहवाल देशातील महत्त्वाच्या ९ शहरातील कर्मचा-यांच्या पगारावर आधारीत आहे. अहवालानुसार अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, मुंबई आणि पुणे या शहरात काम करणा-या कर्मचा-यांच्या पगारात सरासरी १२ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
चालू वर्षात कर्मचा-यांचचा पगार किती वाढणार यावर आधारीत हा अहवाल आहे. देशातील नऊ शहरे आणि १७ क्षेत्रातील कर्मचा-यांच्या पगाराचा अभ्यास करून हा अहवाल बनवण्यात आला आहे. या अहवालानुसार चालू वर्षात कर्मचा-यांच्या पगारात सरासरी ८.१३ टक्क्यांपर्यंत वाढीचा अंदाज आहे. यंदा प्रत्येक क्षेत्रातील कर्मचा-यांच्या पगारात मर्यादीम तरी वाढ नक्की होईल, असे देखील या अहवालात म्हटले आहे.
अहवालानुसार अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, मुंबई आणि पुणे या शहरात काम करणा-या कर्मचा-यांच्या पगारात सरासरी १२ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. गेले दोन वर्ष कोरोनामुळे पगारवाढ रखडली होती. मात्र यंदा या रिपोर्टमुळे कर्मचा-यांना थोडातरी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
कृषिसह ११ क्षेत्रात कमी पगारवाढ
टीमलीजच्या अहवालानुसार कृषि, रासायनिक खते, ऑटोमोबाईल आणि त्याच्याशी संबंधित इतर क्षेत्र, बँक, वित्तसंस्था, बीपीओ सेक्टर, आयटी, बांधकाम क्षेत्र, शिक्षण आणि शिक्षणाशी संबंधित इतर क्षेत्रात काम करणा-या कर्मचा-यांच्या पगारात वाढ होईल, मात्र ती दहा टक्क्यांपेक्षा कमी असेल असे म्हटले आहे.