31.3 C
Latur
Tuesday, May 30, 2023
Homeमनोरंजनमुंबई हायकोर्टाचा सलमान खानला मोठा दिलासा

मुंबई हायकोर्टाचा सलमान खानला मोठा दिलासा

एकमत ऑनलाईन

मुंबई: सलमान खानला २०१९ साली पत्रकाराशी गैरवर्तन आणि धमकी दिल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सलमान खानवर २०१९ साली पत्रकाराशी गैरवर्तन आणि धमकी दिल्याचा आरोप करण्यात होता. अंधेरी मेट्रोपॉलिटन कोर्टाने सलमानविरुद्ध बजावलेले समन्स फेटाळत, हायकोर्टाने संपूर्ण प्रकरणच फेटाळले आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

सलमानवर पत्रकार अशोक पांडेंनी धमकवल्याचा आरोप होता. मुंबई उच्च न्यायालयाने सलमानविरोधातील एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सलमानला अंधेरी कोर्टात हजर राहावे लागणार नाही, उच्च न्यायालयाने त्याच्याविरोधात दाखल असणारी तक्रार चुकीची असल्याचे म्हणत हे प्रकरण रद्द केले आहे.

सलमान खान अनेक वेळा सायकल वरून बाहेर फिरण्यास निघत असतो. पत्रकार अशोक पांडेंनी त्यांच्या मोबाइलला वरून त्याचे चित्रीकरण केले. त्यावेळी सलमानने पत्रकाराचा फोन हिसकावला. पत्रकाराच्या मते, त्यांनी अभिनेत्याच्या गार्ड्सची परवानगी घेतलेली तरीही त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप सलमान खान आणि त्याच्या बॉडिगार्ड नवाझ शेखवर ठेवण्यात आला होता.

मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. पत्रकाराने अभिनेत्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, सलमानने केवळ गैरवर्तन केले नाही तर त्याचा मोबाइल हिसकावला होता. या प्रकरणी अशोक पांडे यांनी यापूर्वी अंधेरी येथील दंडाधिका-यांकडे तक्रार केली होती. त्यावर अंधेरी मेट्रोपॉलिटन कोर्टाने सलमानला समन्स पाठवले होते. यावर सलमानने उच्च न्यायालयात धाव घेतली. गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्याला दिलासा देत समन्सला स्थगिती दिली होती.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या