उस्मानाबाद : भरधाव वेगाने जाणार्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी दि. २८ जुलै रोजी सकाळी उस्मानाबाद शहरातील आडत लाईन परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
उस्मानाबाद शहरातील तुळजापूर नाका परिसरात राहणारे दोन तरूण गुरुवारी सकाळी दुचाकीवरून जात होते. ते आडत लाईन समोरील किनारा हॉटेलसमोर आले असताना भरधाव वेगाने जाणार्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये सोमा कालिदास पवार (वय १३) याचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील अन्य एकजण जखमी झाला आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.