25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीयहोमिओपॅथी डॉक्‍टरांना अँलोपॅथी प्रॅक्‍टिस करण्याचा हक्क अबाधित

होमिओपॅथी डॉक्‍टरांना अँलोपॅथी प्रॅक्‍टिस करण्याचा हक्क अबाधित

एकमत ऑनलाईन

पिंपरी : आयुर्वेद (बीएएमएस) युनानी (बीयूएमएस) बीएचएमएस (होमिओपॅंथि) या शाखेतील पदवीधरांना ऍलोपथी प्रॅक्‍टिस करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात लोकसभेत 11 सप्टेंबर 2020 रोजि नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टिम ऑफ मेडिकल बिल- 2019 (एनसीआयएसएम) मंजूर करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्‍टिशनर अँक्‍ट 2014 जो महाराष्ट्र राज्यातील इंटिग्रेटेड प्रॅक्‍टिस करणाऱ्या डॉक्‍टरांना लागू होता तो केंद्राने अबाधित ठेवला आहे. याबाबत पिंपरी चिंचवड शहर निमा शाखेचे सचिव डॉ. अभय तांबिले यांनी माहिती दिली.

निमाने प्रधानमंत्री कार्यालय, नीती आयोग, भारतीय चिकित्सा परिषद, राष्ट्रीय आयोगासमोर इंटिग्रेटेड प्रॅक्‍टिस करणाऱ्या डॉक्‍टरांची बाजू खंबीरपणे मांडली. त्यामध्ये इंटिग्रेटेड डॉक्‍टरांचा राष्ट्रीय कार्यक्रमातील सहभाग, भारतात डॉक्‍टरांची संख्या कमी असल्यामुळे खेडोपाडी नागरी वस्त्यांवर इंटिग्रेटेड डॉक्‍टरांची अनोखी कामगिरी असे हे इंटिग्रेटेड प्रॅक्‍टिस करणारे डॉक्‍टर अशी प्रतिमा देशभर निर्माण केली. या लढयामध्ये निमाच्या स्थानिक, जिल्हा व राज्य शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना शांततामय मार्गाने वेळोवेळी निवेदन दिले. शहरातील वाढती लोकसंख्या तसेच खेडेगावात एमबीबीएस डॉक्‍टरांची कमतरता या सर्व गोष्टींचा विचार करून इंटिग्रेटेड प्रॅक्‍टिस करणाऱ्या डॉक्‍टरांनी सामाजिक आरोग्य राखण्यासाठी पदवीधरांना अँलोपॅंथी प्रॅक्‍टिस करण्याची परवानगी मिळावी, अशी निमाची भूमिका होती.

लोकसभेत हे विधेयक मंजूर झाल्यामुळे आय.एस.एम डॉक्‍टरांचा अँलोपॅंथी प्रॅक्‍टिस करण्याचा मार्ग सुलभ झाला. निमा पिंपरी चिंचवड शाखेचे सर्व आजी, माजी पदाधिकारी त्यामध्ये निमा शाखेचे अध्यक्ष डॉ. सत्यजित पाटील, खजिनदार डॉ. सुनील पाटील स्टेटचे पदाधिकारी डॉ. दत्तात्रय कोकाटे व इतर सर्व निमा सदस्य यांनी वेळोवेळी सर्व आंदोलने व मोर्चे यांमध्ये सहभाग घेतला.

मुंबईत वाढत्या रुग्णसंख्येमुळे 144 कलम लागू

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या