27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीयबिटकॉईन नीचांकी पातळीवर

बिटकॉईन नीचांकी पातळीवर

एकमत ऑनलाईन

२० हजारांच्या खाली घसरण, २२ लाख कोटी बुडाले
नवी दिल्ली : काही दिवसांपासून बिटकॉइनमध्ये सातत्याने घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर्षी बिटकॉइनमध्ये विक्रमी घसरण झाली आहे. शनिवारी बिटकॉइन २०,००० डॉलरच्या खाली आला. त्यामुळे बिटकॉइन १८ महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचला. आज बिटकॉइन यूएसडी १९,३५९.७० वर व्यापार करीत होता. यावर्षी बिटकॉईन सुमारे ५९ टक्क्यांनी घसरले, तर प्रतिस्पर्धी क्रिप्टोकरन्सी इथरियम-समर्थीत इथरने विक्रमी ७३ टक्के घसरण केली.

ही मोठी घसरण जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे झाली आहे. कोरोना महामारीमुळे जागतिक मंदी, फेब्रुवारीपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध, वाढती महागाई आणि फेडरल बँकेने व्याजदरात केलेली वाढ ही यामागील प्रमुख कारणे असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीत सतत वाढीव व्यापार करीत असलेले टिथर कॉईनही खाली आले आहे. ते ८३.४३ रुपयांपर्यंत किरकोळ कमी झाले आहे.

जगातील सर्वांत लोकप्रिय बिटकॉइनमध्ये २४ तासांत नऊ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्याचे मूल्य १,५३,५८४ रुपयांनी घसरून १६,०९,१८८ रुपयांवर आले. या किमतीत बिटकॉइनचे बाजार भांडवलही ३१.४ ट्रिलियनवर घसरले आहे. याशिवाय बिटकॉइननंतर दुस-या क्रमांकाची सर्वाधिक पसंती असलेली क्रिप्टोकरन्सी इथरियमची किंमतही ९.२३ टक्क्यांनी घसरली. ती ८,४९९ रुपयांनी घसरून ८३,६१८ रुपयांवर आली. मार्केट कॅपदेखील १०.५ ट्रिलियनवर घसरले आहे.

२२ लाख कोटी बुडाले

प्रचंड घसरणीमुळे गुंतवणूकदारांची झोप उडाली. गेल्या ७ दिवसांत क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये गुंतवणूक करणा-यांचे २२ लाख कोटींचे नुकसान झाले. हा आठवडा केवळ क्रिप्टो मार्केटसाठीच नाही तर शेअर बाजारांसाठीही वाईट ठरला आहे. अमेरिकेपासून भारतीय बाजारांपर्यंत गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या