बलिया : उत्तर प्रदेशमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याचे वारंवार दिसून येत आहे. बलात्कार प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना आता साक्षात पोलिसांसमोरच गोळ्या घालून हत्या करण्यात येत आहेत. अशीच गंभीर घटना बलिया मध्ये घडली. रेशन दुकानांसंबंधी बैठक सुरु असताना वाद झाल्याने भाजपाच्या कार्यकर्त्याने एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या केली. दुसरी कडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही घटनास्थळी उपस्थित अधिका-यांच्याच निलंबनाचा आदेश देऊन कडी केली आहे.
वृत्तानुसार, भाजपा कार्यकर्ता धिरेंद्र सिंह याने जयप्रकाश यांची गोळ्या घालून हत्या केली. धिरेंद्र सिंह हा भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांचा निकटवर्तीय आहे. रेशन दुकानांच्या वाटपासाठी बैठक बोलावली होती. पण सदस्यांमध्ये असलेल्या वादामुळे अधिकाºयांनी बैठक रद्द करण्याचा निर्णय घेतला. याचवेळी वाद निर्माण झाला आणि गोळीबार करण्यात आला अशी माहिती पोलिसांनी दिली. बैठकीसाठी प्रशासकीय तसेच पोलीस अधिकारीही उपस्थित होते.आमदार सुरेंद्र सिंह यांनी आरोपी भाजपा कार्यकर्ता असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पीडित व्यक्तीच्या भावाने केलेल्या तक्रारीनंतर १५ ते २० जणांविरोधात तक्रार दाखल