25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रभाजपने रणशिंग फुंकले

भाजपने रणशिंग फुंकले

एकमत ऑनलाईन

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत नगरसेवक आणि पक्षातील महत्त्वाच्या पदाधिका-यांची आज बैठक घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला असून एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना आहे, असे वक्तव्य केले. त्याबरोबर उद्धव ठाकरे यांनी पाठीत खंजीर खुपसला आहे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. दरम्यान, आगामी मनपा निवडणुकीत भाजपने १५० जागा निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवले असून, मुंबईचा महापौर भाजपचाच असेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शहांच्या टिकेला शिवसेनेनेही जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी पदाधिका-यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला असून येणा-या निवडणुकांत मुंबईचा महापौर भाजपचाच असेल. उद्धव ठाकरे यांना आता जमीन दाखवायची वेळ आली आहे, म्हणून ही आपली शेवटची निवडणूक आहे असे समजा. कारण अभी नही तो कभी नही…असा आदेश शहांनी आपल्या पदाधिका-यांना दिला. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या युतीसमोर शिवसेनेच्या ठाकरे गटाचा निभाव लागणार का, हे पाहावे लागणार आहे.

२०१४ च्या निवडणुकीत फक्त २ जागेसाठी शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली. खरे म्हणजे उद्धव ठाकरेंनी आमच्याच पाठीत खंजीर खुपसला. पण राजकारणात धोका देणारा कधीच यशस्वी होत नाही. त्यामुळे त्यांना आता शिक्षा व्हायला पाहिजे. उद्धव ठाकरेंना जमीन दाखवण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य अमित शाह यांनी केले. शिवसेना ही स्वत:च्या निर्णयामुळे छोटी झाली. पण एकनाथ शिंदे हीच खरी शिवसेना आहे आणि ते आपल्यासोबत आहेत. त्यामुळे आता आपल्याला मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयार राहायचे आहे, असा आदेश त्यांनी दिला.

धोका देणा-यांना धडा शिकवा
एखाद्याला थप्पड मारली तर त्याला त्रास होतो, पण त्याच्या घरासमोर थप्पड मारली तर अधिक त्रास होतो, असे सांगत मुंबईत शिवसेनेला धडा शिकवण्याचा निर्धार अमित शाह यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रावर वर्चस्व मिळवायचे असेल तर मुंबईवर वर्चस्व मिळवावे लागेल. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी आता सर्वात चांगली संधी असल्याचे ते म्हणाले.

एकनाथ शिंदेंचा मुंबई मनपातून पत्ता कट?
मुंबई महापालिकेत पुढचा महापौर भाजपचाच होणार, असा विश्वास अमित शाहांनी व्यक्त केला. त्यामुळे आता शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या महापालिकेत शिंदे गटाला महापौरपद मिळणार नाही, हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे भाजपसोबत युती असलेल्या शिंदे गटाचाही महापालिकेतून पत्ता कट होणार का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या