22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeप्रारूप मतदार याद्यांवर भाजपा शहराध्यक्ष यांचा आक्षेप

प्रारूप मतदार याद्यांवर भाजपा शहराध्यक्ष यांचा आक्षेप

एकमत ऑनलाईन

हदगाव : शहरातील नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आले असून त्यावर भाजपा शहराध्यक्ष बाळा पाटील यांनी आक्षेप घेत शहरातील काही प्रभागातील नागरिकांचे नावे जाणून बुजून दुर्स­या प्रभागात समाविष्ट करण्यात आले असून हे कोणाला तरी फायदा पोहोचविण्याचा कट असल्याचा संशय दिसून येत असून त्यावर उचित कारवाई व्हावी असे आशयाचे निवेदन बाळा पाटील यांनी दिले.

हदगाव नगर परिषद च्या प्रारुप मतदार यादीनुसार हदगाव शहरातल्या ठरलेल्या प्रभाग रचनेपैकी प्रभाग क्र.५ द्रोनागिरी नगर, नगर परिषदेचा पाठीमागील परिसर, कोर्टच्या बाजूचा परिसर, वडार गल्ली, दत्तबर्डी रोड, पूर्व- पश्चिम बाजू जे की या ठरलेल्या प्रभाग रचनेनुसार मतदार यादीमध्ये प्रभाग सोडून प्रभाग क्र.४ मधील भरपूर मतदार यांचे नाव नजरचुकीने प्रभाग क्र.५ मध्ये समाविष्ट करण्यात आले असून ते पुन्हा मतदान प्रभाग क्र.५ मधून काढून पूर्वीच्या ठिकाणी म्हणजे प्रभाग क्र.४ मध्ये समाविष्ट करण्यात यावे.

या सगळ्या घडामोडी पाहता याचा फायदा सत्ताधा-यांना पोहचविण्याचे पुरेपूर प्रयत्न झाल्याचे दिसून येत असून पूर्ण शहरात ग्रामीण भागातील नागरिकांचे नावे नोंदवून एकाच पक्षाला फायदा कसा पोहोचवता येईल अशी व्यवस्था करण्यात आल्याची दाट शक्यता असल्याचे पण शेवटी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना भाजपा शहराध्यक्ष बाळा पाटील यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या