21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रचंद्रकांत पाटलांचे भाषण भाजपने सोशल मीडियावरून हटवले

चंद्रकांत पाटलांचे भाषण भाजपने सोशल मीडियावरून हटवले

एकमत ऑनलाईन

मुंबई : चंद्रकांत पाटील यांनी छातीवर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले असे वक्तव्य केले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर भाजपने खबरदारी घेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे ते भाषण आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवले आहे.

केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. आपल्याला दु:ख झालं. पण आपण दु:ख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता. असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यानंतर चर्चां सुरू झाल्या होत्या.

या प्रकरणानंतर भाजपच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हे भाषण काढून टाकण्यात आलं आहे. फेसबुक, ट्वीटर आणि युट्यूबवरून ते भाषण काढून टाकण्यात आले आहे. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यामुळे आणि उघड उघड व्यक्त केलेल्या नाराजीमुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याची खंत भाजप नेत्यांमध्ये आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. या चर्चांना ब्रेक लागावा यासाठी भाजपने हे पाऊल उचलले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या