24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयमहिला सन्मानाची व्याख्या भाजपने दाखवून दिली

महिला सन्मानाची व्याख्या भाजपने दाखवून दिली

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गुजरात राज्यात बिलकीस बानो हिच्यावर अत्याचार करणारे, तिच्या कुटुंबातील सदस्यांची हत्या करणा-या लोकांची शिक्षा माफ करण्याचे काम गुजरात सरकारने केले हे पाहून पंतप्रधान मोदी यांच्या मनामध्ये महिला सन्मानाची व्याख्या काय आहे ते भाजपने दाखवून दिल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची शनिवारी फेरनिवड करण्यात आली. नवी दिल्लीत कॉन्स्टिट्युशन क्लब ऑफ इंडियाच्या सभागृहात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत ही निवड पार पडली. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. पवार यांनी ट्विट करून मोदींवर निशाणा साधला.

शरद पवार म्हणाले की, १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून महिलांच्या आदराविषयी भाषण केले. एकीकडे महिलांच्या सन्मानाच्या गोष्टी करायच्या अन् दुसरीकडे आपल्या गुजरात राज्यात बिलकीस बानो हिच्यावर अत्याचार करणारे, तिच्या कुटुंबातील सदस्यांची हत्या करणा-या लोकांची शिक्षा माफ करण्याचे काम गुजरात सरकारने केले. हे पाहून मी आश्चर्यचकित झाल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या