23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeऔरंगाबादभाजपचे नेतेच बहिरे : खैरेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर!

भाजपचे नेतेच बहिरे : खैरेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर!

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्याचे आता विसरा, अशी खोचक टीका करणा-या फडणवीसांना शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी चांगलेच सुनावले आहे.
भाजपची सत्ता होती, तेव्हा मी फडणवीसांना अनेकदा विनंती केली. त्यांना भगवी शाल अर्पण करायचो, ते फक्त गोड हसायचे आणि हो करून टाकू असे म्हणायचे. पण औरंगाबादचे नाव संभाजीनगर काही केले नाही. त्यांनी या कानाने ऐकले आणि त्या कानाने सोडून दिले. त्यांच्या या कृतीतून मी बहिरा नसून भाजपचे सर्वच नेते बहिरे आहेत असे प्रत्युत्तर खैरे यांनी दिले आहे.
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत खैरे यांनाही टोला मारला. उद्धव ठाकरेंनी संभाजीनगर म्हटल्यावर ठराव मंजूर करण्याची गरज नाही. त्यामुळे ओ खैरे, व्हा तुम्ही बहिरे.. अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

शंभर भगव्या शाली
भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले, भाजपचे सरकार असताना मी अनेकदा फडणवीसांचे भगवी शाल देऊन स्वागत केले. अशा प्रकारे शंभर भगव्या शाली असल्याचे त्यांनी स्वत: सांगितले होते. दरवेळी मी औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्यासाठी विनंती करायचो, मात्र त्यांनी कधीही ते गांभीर्याने घेतलं नाही. आता शिवसेनेवर दबाव आणण्यापूर्वी आपण काय केले, हे भाजपने पहावे. भाजपचे सगळे मंत्री खोटारडे आहेत, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या