24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रभाजप मित्रपक्षांना कधीही धोका देत नाही; देवेंद्र फडणवीसांचे शरद पवार यांना...

भाजप मित्रपक्षांना कधीही धोका देत नाही; देवेंद्र फडणवीसांचे शरद पवार यांना प्रत्युत्तर

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे. त्यांच्यासोबत ५० आमदार आहेत. तरीही भाजपने त्यांना मुख्यमंत्रिपद दिले. भाजप मित्रपक्षांना कधीही धोका देत नाही. काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यामध्ये त्यांच्या आणि आमच्या प्रत्येकी ९-९ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामुळे मला असे वाटते की, पवार साहेबांचे दु:ख वेगळे आहे. ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान भाजपने गेल्या काही वर्षांमध्ये मित्रपक्षांना सातत्याने संपवण्याचे काम केले आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले होते. त्यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

महाराष्ट्रात शिवसेना आमच्यासोबत होती. पण त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे खरी शिवसेना आमच्यासोबत आली. आता शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे. त्यांच्यासोबत ५० आमदार आहेत. तरीही भाजपने त्यांना मुख्यमंत्रिपद दिले.

काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यामध्ये त्यांच्या आणि आमच्या प्रत्येकी ९-९ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामुळे मला असे वाटते की, पवार साहेबांचे दु:ख वेगळे आहे. ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

बिहारमध्ये भाजपचे ७५ लोक निवडून आले होते. तर संयुक्त जनता दलाचे ४२ आमदार निवडून आले होते. तरीही भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे भाजप मित्रपक्षांना कधीही धोका देत नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे सर्व आरोप फेटाळून लावले.

शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेना पक्षावर करण्यात येणारा दावा अयोग्य असल्याचे म्हटले होते. मी काँग्रेस पक्ष सोडला तेव्हा मी वेगळे चिन्ह घेऊन लढलो, याची आठवण पवार यांनी सांगितली. त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी म्हटले की, शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडला तेव्हा पक्षांतरबंदी कायदाच अस्तित्वात नव्हता. आज तो कायदा अस्तित्वात आहे. आज कायदे तयार झाले म्हणून शिंदे साहेब म्हणजे शिवसेना कायदेशीर लढाई लढत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या