25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रभाजप-शिवसेना येत्या निवडणुकीत २०० आमदार निवडून आणणार : मुख्यमंत्री शिंदे

भाजप-शिवसेना येत्या निवडणुकीत २०० आमदार निवडून आणणार : मुख्यमंत्री शिंदे

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना फक्त हिंदुत्वाच्या विचारावर एकत्र आली आहे. दोन्ही पक्षाचा काहीच स्वार्थ नाही. आमच्या दोघांचा पक्ष हिन्दूत्वाचा मार्गाने चालतो. आज भाजपचे ११५ आमदार आहे आणि शिवसेनेचे ५० आमदार आहेत मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी आम्ही दोघंमिळून येत्या निवडणुकीत १६५ आमदारांचे २०० आमदार निवडून आणू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दर्शवला आहे.

आम्ही जर २०० आमदार निवडून आणले नाही तर मी शेतात जाऊन शेती करेन, असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी मी मुख्यमंत्री होणार अशा चर्चा होत्या मात्र पवारांच्या सांगण्यावरुन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात आले. मला पदाची किंवा सत्तेची लालसा नाही. लालसेपोटी मी बंडखोरी केली नाही. मला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार पुढे न्यायचे होते आणि अर्थात जनतेची निस्वार्थपणे सेवा करायची होती त्यामुळे मी बंडाचे पाऊल उचलले.

मी मंत्री असताना अनेकांंनी माझ्या कामात अडथळे आणले. अनेकांनी हस्तक्षेप केला मी मात्र चकार शब्द काढला नाही. शिवसेनेचाच होतो आणि शिवसेनेचाच राहीन असे म्हणत त्यांनी विरोधी पक्षाला टोलाही लगावला. शिवसेना आणि भाजपचे सरकार पुन्हा आले आहे. माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेना व इतर अपक्षांचे ५० आमदार सोबत होते. माझ्यावर विश्वास ठेवून साथ दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. विरोधी पक्षातून सत्तेकडे जातात, असं दिसून येतात. मात्र, आम्ही सत्तेतून विरोधात गेलो. महाराष्ट्रातील सत्तांतर ही ऐतिहासिक घटना आहे. या घटनेची देशाने नव्हे ३३ देशांनी दखल घेतली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या