24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeमहाराष्ट्रभाजप प्रवक्त्या नुपूर शर्मांवर मुंबईत गुन्हा दाखल

भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मांवर मुंबईत गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

मुंबई : राष्ट्रीय दूरचित्रवाणीवरील टिप्पण्यांमुळे एका विशिष्ट समुदायाच्या भावना दुखावल्याबद्दल भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध आयपीसीचे कलम २९५अ (धार्मिक भावना दुखावणे), १५३ अ (दंगली भडकवण्याचा प्रयत्न) आणि ५०५ इ (जनतेत भीती निर्माण करणे) अंतर्गत मुंबईत एफआयआर दाखल झाला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. भारतीय सुन्नी मुस्लिमांची संघटना असलेल्या रझा अकादमीच्या तक्रारीवरून भाजप नेत्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टीव्हीवरील चर्चेदरम्यान एका विशिष्ट धर्माबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी भाजप नेत्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

या संदर्भात भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी सांगितले की, ज्ञानवापी प्रकरणातील एका टीव्ही चर्चेचा संपादित व्हीडीओ प्रसारित केल्यानंतर, मला इस्लामिक कट्टरपंथीयांकडून सोशल मीडियावर सतत बलात्काराच्या धमक्या येत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

नुपूर शर्मा यांनी २०१५ची दिल्ली विधानसभा निवडणूक आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लढवली होती. अभाविप उमेदवार म्हणून त्या दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षाही होत्या.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या