22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरेंच्या भेटीला

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरेंच्या भेटीला

एकमत ऑनलाईन

मुंबई : मनसे आणि भाजपची युती होण्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरत आहेत. युतीचे संकेत देण्यासाठी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींचे सत्रही वाढत आहे. नुकतीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

राज ठाकरे यांच्या नव्या शीवतीर्थ या बंगल्यावर ही भेट झाली. काही दिवसांपूर्वीच चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच राज ठाकरेंची भेट घेतली. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीत काय चर्चा झाली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र भेटीला नक्कीच काहीतरी राजकीय अर्थ असल्याचे सांगण्यात येत आहे.

चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरे यांच्या भेटीपूर्वी राज ठाकरे यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दोघांमध्ये जवळपास एक तासभर चर्चा झाली. यात नेमक्या कोणत्या मुद्यांवर खलबतं झाली, हे अद्याप पुढे येऊ शकलेले नाही. उद्यापासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. राज ठाकरे यांच्या शीवतीर्थ बंगल्यावर पहिल्यांदाच गणपतीची स्थापना होणार आहे. या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना त्यांनी या भेटीत आमंत्रण दिल्याचे सांगण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या