22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeभाजप इतिहासाची पुनरावृत्ती करणार

भाजप इतिहासाची पुनरावृत्ती करणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात येत्या दोन-तीन दिवसांत भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठी महाराष्ट्रातून मदत मिळू शकते. तसेच २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीची पुन्हा पुनरावृत्ती होऊ शकते.

कारण, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पक्ष आधीच सत्तेत आहे. आकडेवारी पाहिली तर या राज्यांमधून लोकसभेचे १६८ सदस्य निवडून येतात. आता २०२४ चे समीकरण भाजप तीन राज्यांमधील सरकारच्या माध्यमातून आपल्या बाजूने वळवू शकते.

२०१९ मध्ये या तीन मोठ्या राज्यांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे म्हणजेच, एनडीएचे सरकार होते. इथे १६८ जागांपैकी एनडीएला १४४ जागा मिळाल्या होत्या. त्याचाच परिणाम असा झाला की, लोकसभेत युतीने विक्रमी ३५२ चा आकडा गाठला होता. भाजपकडे महाराष्ट्रासाठी मोठी विकास योजना आहे. यामध्ये मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची सुधारणा करणे आणि २०२४ मध्ये मतदारांसमोर ठेवणे समाविष्ट आहे.

२०१९ च्या आधी पक्षाने बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासोबत सरकार स्थापन केले. यापूर्वी कुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाशी संबंध तोडले होते. त्याचवेळी, भाजपला प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर यूपीमध्ये सरकार स्थापन करण्यात यश आले. तर, महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वेगळे होण्यापूर्वी भाजप राज्यात शिवसेनेसोबत सरकार चालवत होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या