19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeराष्ट्रीयभाजपची पहिली यादी जाहीर

भाजपची पहिली यादी जाहीर

एकमत ऑनलाईन

लखनौ : भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. दरम्यान, भाजपच्या जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार १०७ विधानसभा जागांपैकी ६८% जागा मागासवर्गीय, दलित आणि महिलांना देण्यात आल्या आहेत. १०७ उमेदवारांपैकी ४४ ओबीसी, १९ एससी आणि १० महिला उमेदवार आहेत. त्याचवेळी सर्वसाधारण जागेवरून अनुसूचित जातीच्या एका उमेदवाराला तिकीट देण्यात आले आहे. उर्वरित जागांवर सवर्णांना तिकीट देण्यात आले आहे.

भारतीय जनता पक्षाने १०७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये ८३ पैकी ६३ विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे, तर २० उमेदवारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. त्याचवेळी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आगामी विधानसभा निवडणुकीत गोरखपूर शहरातून, तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य कौशांबी जिल्ह्यातील सिरथू मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. पहिल्या दोन टप्प्यांसाठी, भाजपने दलित, महिला आणि मागासवर्गीय समुदायातील उमेदवारांना सुमारे ६८ टक्के जागा देण्यात आल्या आहेत. वास्तविक, पश्चिम उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव आणि जयंत चौधरी यांची युती आणि पक्षाचे नेते सपामध्ये सामील होत असल्याने भाजपने जाणीवपूर्वक हे उमेदवार उभे केल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

योगींना गोरखपूरमधून उमेदवारी
उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. योगी आदित्यनाथ यांना नेमका कोणता मतदार संघ मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यामुळे आज ही यादी जाहीर झाल्यानंतर योगींच्या मतदार संघाची सर्वात जास्त चर्चा सुरू आहे. योगी आदित्यनाथ यांना गोरखपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या