मुंबई : पुणे पोटनिवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि चिंचवडमधून भाजपच्या अश्विनी जगताप यांनी विजयाचा झेंडा फडकवला आहे.
दरम्यान यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. तर यावरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला आहे.
मतदार वेगळा विचार करू शकतात हे समोर आले असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. तर ‘वापरा आणि फेका’ ही भाजपची नीती भाजपला भोवली असल्याचे ठाकरे म्हणाले.
तसेच पोटनिवडणूक जिंकलो याचा आनंद आहे. तसेच जर कसबा इतक्या वर्षांनंतर बाहेर पडू शकतो, तर देश देखील बाहेर पडू शकतो, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.