24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्रीडाब्लॅक ब्युटी सेरेना करणार टेनिसला अलविदा

ब्लॅक ब्युटी सेरेना करणार टेनिसला अलविदा

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : टेनिस विश्वाला आज एक मोठा धक्का बसला. कारण टेनिस विश्वास ब्लॅक ब्युटी या नावाने प्रसिद्ध असलेल्या सेरेना विल्यम्सने आज आपल्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत. टेनिस विश्वातील मानाच्या ग्रॅडस्लॅम स्पर्धेनंतर ती निवृत्ती घेणार असल्याचे समोर येत आहे.

एका खास मुलाखतीत सेरेना म्हणाली होती की, आयुष्यात एक वेळ अशी येते, जेव्हा आपल्याला वेगळ््या दिशेने जाण्याचा निर्णय घ्यावा लागतो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर खूप प्रेम करतो आणि ती गोष्ट आपल्याला सोडण्याची वेळ येते, तेव्हा तो काळ नेहमीच कठीण असतो. मी नेहमीच टेनिसचा आनंद घेते. मात्र, आता माझा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. मी आता आई झाले आहे. त्यामुळे आयुष्यात ब-याच गोष्टी बदलल्या आहेत. आता काही गोष्टींना प्रधान्य द्यायचे मी ठरवले आहे. पुढील काही आठवडे मी टेनिसचा मनमुराद आनंद लुटणार आहे.

सेरेनाने तिच्या कारकिर्दीत २३ ग्रँडस्लॅम एकेरी जेतेपदे जिंकली आहेत. मार्गारेट कोर्टच्या नावावर सर्वात जास्त २४ जेतेपदे आहेत. पण टेनिसचा विचार केला, तर सेरेनालाच सर्वकालीन सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू मानली जाते. कारण तिने आपल्या खेळाने महिला टेनिसला नवा आयाम दिला होता. सेरेनाने आपला एक दबदबा निर्माण केला होता. सेरेना पुरुष टेनिसपटूंबरोबर उतरली तर ती त्यांनाही पराभूत करू शकेल, असे चाहते म्हणायचे. टेनिस कोर्टवर जोरकस फटक्यांसाठी ती प्रसिद्ध होती. सेरेनाची बहीण व्हीनसदेखील टेनिसपटूच होती. पण व्हीनसपेक्षा सेरेनाने जास्त सामने जिंकले आणि टेनिस विश्वात आपले एकेकाळ निर्विवाद वर्चस्व राखले होते. पण गेल्या काही वर्षांच तिच्या आयुष्यात बरेच बदल झाले आहेत. त्यामुळे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेनंतर ती निवृत्ती घेऊ शकते, असे संकेत मिळत आहेत.

महिलांमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विश्वविक्रम सेरेनाच्या नावावर आहे. सेरेना ३६५ ग्रँडस्लॅम सामने जिंकून ती महिलांमध्ये प्रथम स्थानावर आहे. त्यानंतर महिलांमध्ये दुस-या स्थानावर मार्टिना नवरातिलोव्हा आहे. मार्टिना नवरातिलोव्हाने ३०५ सामने जिंकले होते. त्यामुळे आता सेरेनाचा हा विक्रम कोणी मोडू शकेल, असे सध्याच्या घडीला तरी दिसत नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या