25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeआंतरराष्ट्रीयकाबूलमधील रशियन दूतावासाजवळील स्फोटात २० ठार

काबूलमधील रशियन दूतावासाजवळील स्फोटात २० ठार

एकमत ऑनलाईन

काबूल : रशियन वृत्तसंस्था स्पुतनिकने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानची राष्ट्रीय राजधानी काबूल येथील रशियन दूतावासाच्या परिसरात आज (सोमवारी) मोठा स्फोट झाला. स्फोटात दोन रशियन व्यक्तींचा समावेश असून २० लोक ठार झाले आहेत. तर जखमींची संख्या स्पष्ट झाली नाही. मृत्यु आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तालिबानच्या राजवटीत बॉम्बस्फोट ही एक सामान्य बाब बनली आहे.

शुक्रवारी हेरात प्रांतातील मशिदीला हादरवून सोडणा-या स्फोटात ठार झालेल्या लोकांमध्ये एक प्रमुख अफगाण धर्मगुरूचा समावेश होता, असे अधिका-यांनी सांगितले. मशिदीमध्ये शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी हा स्फोट झाला, असे टोलो न्यूजने म्हटले आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, एका मशिदीत मोठा स्फोट झाला, परिणामी किमान २१ लोक ठार झाले आणि ३० हून अधिक जण जखमी झाले. गेल्या वर्षी ऑगस्टच्या मध्यात तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देशात पाठोपाठ बॉम्बस्फोट होत आहेत हे उल्लेखनीय आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या कारकिर्दीत देशात मृतांची संख्या जास्त होती परंतु त्यांच्या राजवटीत स्फोटांची संख्या कमी होती. तालिबानच्या राजवटीत राजधानीत बॉम्बस्फोट होणे ही एक नवीन बाब बनली आहे असे अहवालात म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या