25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeराष्ट्रीय६७ पॉर्न वेबसाईटस् ब्लॉक

६७ पॉर्न वेबसाईटस् ब्लॉक

एकमत ऑनलाईन

केंद्र सरकारचे इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्यांना आदेश
नवी दिल्ली : केंद्र सरकारने गुरुवारी ६७ पॉर्न वेबसाइट्सवर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. २०२१ मध्ये जारी करण्यात आलेल्या नवीन माहिती तंत्रज्ञान नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सरकारने इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्यांना या ६७ पॉर्न वेबसाइट ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने इंटरनेट सेवा पुरवणा-या कंपन्यांना याबाबत लेखी आदेश दिले.

दूरसंचार विभागाने इंटरनेटचा पुरवठा करणा-या कंपन्यांना पुणे न्यायालयाच्या आदेशानुसार ६३ आणि उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ४ पॉर्न वेबसाईटवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. २४ सप्टेंबर रोजी दूरसंचार विभागाने याबाबतचा आदेश जारी केला आहे. या आदेशात म्हटले आहे की, या वेबसाइटवर काही अश्लील साहित्य उपलब्ध आहे, ज्यामुळे महिलांच्या विनयशीलतेचा भंग होतो. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या वेबसाइट्स तात्काळ ब्लॉक करण्याचा आदेश जारी केला आहे.

२०२१ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने लागू केलेल्या नवीन आयटी नियमांमुळे कंपन्यांना एखाद्या व्यक्तीला पूर्ण किंवा थोड्याशा प्रमाणात नग्न दाखवणा-या किंवा लैंगिक संबंधात गुंतलेले दाखवणा-या सामग्री प्रसारण आणि त्यांच्याद्वारे संग्रहित किंवा प्रकाशित केलेल्या सामग्रीला ब्लॉक करणे बंधनकारक केले आहे.

दुस-यांदा कारवाई
दरम्यान, केंद्र सरकारने या पूर्वीदेखील याबाबत मोठा निर्णय घेतला होता. २०१७ मध्ये केंद्र सरकारने ३ हजार पॉर्न साईटवर बंदी घातली होती. त्यानंतर आता केंद्राने दुस-यांदा हे पाऊल उचलले आहे. पॉर्न साईटवर बंदी न घातल्यामुळे २०१६ ला न्यायालयाने केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर २०१७ मध्ये केंद्राने तब्बल ३ हजार पॉर्न साईवर बंदी घातली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या