लातूर : प्रतिनिधी
शहरातील हडको कॉलनी येथे कोरोनाचा रुग्ण सापडल्यामुळे हा परिसर कंटेनमेंट झोन-२ घोषित झाला आहे. या भागात ६८ कुटुंबं आहेत व लोकसंख्या ४७० इतकी आहे.
कंटेनमेंट झोन करिता स्पेशल रिस्पॉन्स टीम गठीत करण्यात आलेली आहे. रविवारी महानगरपालिकेच्या वतीने मुख्य रस्त्यासह संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. मुख्य रस्ता व परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.
Read More हिंगोलीची वाटचाल लाल रेड झोनकडे
थर्मल स्क्रिनिंगदेखील करण्यात येत आहे़ या भागातील नागरिकांना किराणा, भाजीपाला, दूध, औषधे आदी जीवनावश्यक वस्तू योग्य दरात घरपोच उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. कोरोना रुग्ण सापडले म्हणून बॅकफूटवर न जाता उलट आपण कंटेनमेंट झोन मध्ये आक्रमक धोरण स्वीकारले आहे.