22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयरॅडिसन हॉटेलमध्ये ७० रूम बुक, रोज ८ लाखांचा खर्च

रॅडिसन हॉटेलमध्ये ७० रूम बुक, रोज ८ लाखांचा खर्च

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील शिवसेनेत उभी फूट पाडून एकनाथ खडसे आणि त्यांचे समर्थक आमदार सध्या आसाममधील गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आहेत. या हॉटेलमधील ७० रुम या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी बुक करण्यात आल्या आहेत. बंडखोरांच्या या लवाजम्यासाठी दिवसाला ८ लाखांचा खर्च तर ७ दिवसांचा खर्च हा ५६ लाख रुपये इतका असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांसह सुरुवातीला सुरत या ठिकाणी होते. त्या ठिकाणाहून त्यांना एअरलिफ्ट करण्यात आले आणि गुवाहाटीला नेण्यात आले. गुजरात आणि आसाम या दोन्ही राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. गुवाहाटी या ठिकाणच्या रॅडिसन ब्लू या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये या सर्व आमदारांची सोय करण्यात आली. सात दिवसांसाठी ७० रुम बुक करण्यात आल्या. या ७ दिवसांचे भाडे ५६ लाख रुपये असल्याची माहिती आहे. म्हणजे दिवसाला ८ लाख रुपये इतके भाडे आकारले जात आहे.

गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू हे फाईव्ह स्टार हॉटेल असून त्यामध्ये एकूण १९६ रुम आहेत. यामधील ७० रुम या सेनेतील बंडखोर आमदार आणि त्यांच्या टीमसाठी बुक करण्यात आल्या आहेत. आता या हॉटेलमध्ये कोणतीही नवीन बुकिंग करण्यात येत नसून कोणत्याही नवीन व्यक्तीला प्रवेश देण्यात येत नाही. या आधी ज्या कॉन्फरन्स आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यांचे बुकिंग आधीच करुन ठेवण्यात आले होते, ते सर्व बुकिंग रद्द केल्याची माहिती आहे.

भाजपचेच आर्थिक बळ
सुरतमधील खर्च, या सर्व आमदारांना विशेष विमानाने गुवाहाटीला आणणे, इथे त्यांची ठेवण्यात येणारी बडदास्त या सर्वाचा आतापर्यंतचा खर्च कुणालाही माहिती नाही आणि हा सर्व खर्च कोण करत आहे, हेही कुणाला माहिती नाही. मात्र, यांची बडदास्त ठेवण्याचा खर्च मोठा आहे. यामागे भाजपची शक्ती असल्याचे सवश्रुत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या