27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeबोरगाव कोरोनाबाधित क्षेत्र घोषित

बोरगाव कोरोनाबाधित क्षेत्र घोषित

एकमत ऑनलाईन

लातूर/ मुरूड : प्रतिनिधी
मुंबई येथून बोरगाव काळे, ता. लातूर येथे आलेली महिला कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली असून प्रशासनाणे रुग्ण राहात असलेला भाग सील करून गावात १४ दिवसांची संचारबंदी लागू केली आहे़ लातूर तालुक्यात पहिलाच कोरोना रुग्ण निष्पन्न झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे़ दरम्यान, बोरगाव काळे कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे़ गावातील सर्व रस्ते बंद करण्यात आले असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Read More  लॉकडाऊन वाढला; कर्ज वसुलीही पुन्हा स्थगित होणार

Borgaon

बोरगाव काळे येथील एक मुलगी व जावाई मुंबई येथे राहतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते ३ दिवसांपूर्वी बोरगाव येथे आले होते. बोरगाव येथे आल्यानंतर अंगणवाडी ताई यांनी त्यांची माहिती निवळी ग्रामीण रुग्णालयास दिली. ग्रामीण रुग्णालयाच्या टिमने त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यातील जावाई असलेल्या इसमास कोरोनासदृश्य लक्षणे असल्याच्या कारणावरून त्याला तपासणीसाठी मुरूडच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. या वेळी त्याची पत्नी त्याच्या सोबत होती या ठिकाणी काही तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना लातूर येथे जाण्याचा सल्ला दिला. लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत जाण्याचा सल्ला दिला. त्या नंतर या संस्थेत ते दाखल झाले़ संशयित जावाई व त्याच्या पत्नीचा स्वॅब घेण्यात आला. बुधवारी रात्री उशिरा अहवाल आला यात स्त्री रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

उपविभागीय अधिकारी यादव, तहसीलदार स्वप्नील पवार, नायब तहसीलदार राजेश जाधव, गट विकास अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी सांगले, मुरूडचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव गोमारे, पोलिस उपनिरीक्षयक सुर्वे यांनी सकाळीच गावचा ताबा घेतला़ रुग्ण महिला राहात असलेला भाग सील करण्यात आला आहे़ या भागात जाणारे सर्व रास्ते बंद करण्यात आले आहेत. या भागातील नागरिकांना घराबाहेर येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

Read More  भाजीविक्रीला जाताना अपघातात ६ शेतकरी ठार

या भागातील लोकांना लागणारे सर्व साहित्य त्यांना घरपोहोच देण्याच्या सूचना देण्यात आला आहेत. रुग्ण महिलेच्या घरातील पती, मुले, आई यासह त्यांच्या घरात लाईट फिटिंगचे काम केलेला मुलगा आदी ९ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या महिलेच्या पतीच्या संपर्कात आलेल्या मुरूड ग्रामीण रुग्णालयातील एका महिला डॉक्टरांसह २ परिचारिका, ३ शिकावू डॉक्टर यांनाही खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

या लोकांचे स्वॅब नमुने काही दिवसांनंतर घेण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ अशोक सारडा यांनी सांगितले़ दरम्यान गावातील हालचालींवर मुरूडचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव गोमारे, मुरूडचे मंडल अधिकारी अनिल सूर्यवंशी, तलाठी श्रीमती जे़ बी़ गाढवे, ग्रामसेवक देशमुख, बीआयटी अंमलदार डोलारे, निवळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ़ किरण पलंगे व त्यांचे सहकारी लक्षं ठेऊन आहेत. बोरगाव काळे गावचा दैनंदिन संपर्क मुरूड शहराशी आहे. बोरगाव येथे रोगाचा प्रादुर्भाव पसरल्यास मुरूड येथे शिरकाव होण्यास वेळ लागणार नाही़

वैद्यकीय अधिका-यासह ५ जण क्वारंटाईन
रुग्णाच्या परिवारातील इतर सदस्यांचे स्वॅब घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याची प्रक्र्रिया सुरू आहे़ त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी बनविण्यात आली असून त्या लोकांनाही क्वारंटाईन करण्यात येणार आहे. यात मुरूड ग्रामीण रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिकाºयासह ५ जणांचा समावेश आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या