24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रठाकरे गट व शिवसेना दोन्ही वेगळे ; मुख्यमंत्री शिंदेंच्या ट्विटची चर्चा

ठाकरे गट व शिवसेना दोन्ही वेगळे ; मुख्यमंत्री शिंदेंच्या ट्विटची चर्चा

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना कोणाची, एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची? हा प्रश्न अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र तरीही मुख्यमंत्री शिंदेंनी एक ट्विट करत शिवसेना आपलीच असा दावा केल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाबद्दल मुख्यमंत्री शिंदेंनी हे ट्विट केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करत एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरच्या माध्यमातून त्यांनी राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये झालेल्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. आपल्या ट्विटमध्ये एकनाथ शिंदे म्हणतात, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना-भाजप युती सरकारला जनतेचा कौल. शिवसेना-भाजप युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे तसेच मतदारराजाचे अभिनंदन आणि आभार.

यासोबत त्यांनी एक पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये निकालाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये कोणत्या पक्षाच्या किती जागा आहेत, हे नमूद करण्यात आले आहे. त्यात शिवसेनेच्या ४० जागा आणि उद्धव ठाकरे गटाच्या २७ जागा असा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचल्याची चर्चा आहे.

सर्वोच्च न्यायालयात शिंदे विरुद्ध ठाकरे गटाची सुनावणी ८ ऑगस्टला होणार आहे. त्या दिवशी हा निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच एकनाथ शिंदेंनी हे सूचक ट्विट केले आहे. तसेच शिवसेना-भाजप युती सरकारला जनतेचा कौल असेही म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या