22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रदोन्ही परीक्षा देणा-यांना तारखेबाबत पर्याय देणार

दोन्ही परीक्षा देणा-यांना तारखेबाबत पर्याय देणार

एकमत ऑनलाईन

  एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षार्थींना सरकारचा दिलासा
मुंबई : एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी आली आहे. दरम्यान, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी परीक्षार्थींना सरकारने पर्याय दिला आहे. दोन्ही परीक्षा देणा-यांना तारखेबाबत पर्याय देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

२१ ऑगस्ट रोजी एकाच तारखेला एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा आल्याने विद्यार्थ्यांच्या समोर मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र आता यावर सरकारने तोडगा काढला आहे.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा आणि बीएड सीईटी परीक्षा २१ ऑगस्ट या एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडाला होता. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा २१ ऑगस्टला आहे. तर बीएड सीईटी परीक्षा २१ ऑगस्टपासून तीन दिवस आहे.

यामुळे या दोन्ही परीक्षा एकाच तारखेला आल्या आहेत. एका परीक्षेला मुकावे लागणार की काय, अशी भावना आणि संभ्रम परीक्षार्थींच्या मनात होता. पण सरकारने यावर तोडगा काढला आहे. दोन्ही परीक्षा देणा-यांना तारखेबाबत पर्याय देणार असल्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या