26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रबाळासाहेब ठाकरेंच्या दोन्ही लेकरांनी एकत्र यावे

बाळासाहेब ठाकरेंच्या दोन्ही लेकरांनी एकत्र यावे

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या ऐतिहासिक बंडामुळे शिवसेनेच्या अस्तित्वालाच नख लागेल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. सध्याच्या परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी रुपाली पाटील-ठोंबरे यांनी म्हटले की, महाराष्ट्रात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामागे कोणाचा दबाव आहे, सत्ता मिळवण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे, हे स्पष्ट आहे.

पण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणूस जगवण्यासाठी, त्याच्या विकासासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. म्हणूनच त्यांच्या दोन्ही लेकरांनी एकत्र येण्याची हीच खरी वेळ आहे. गंभीर परिस्थितीमध्ये भावाने भावाच्या सोबत खंबीरपणे उभे राहायला पाहिजे, असे आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांना वाटत असल्याचे रुपाली पाटील-ठोंबरे यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यावर आता शिवसेना आणि मनसेच्या गोटात काय प्रतिक्रिया उमटणार, हे पाहावे लागेल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या