35.2 C
Latur
Monday, May 29, 2023
Homeमहाराष्ट्रधावत्या एसटी बसची दोन्ही चाके निखळली

धावत्या एसटी बसची दोन्ही चाके निखळली

एकमत ऑनलाईन

पुणे (आंबेगाव) : पुणे-नाशिक महामार्गावरील आंबेगाव तालुक्यात एक धडकी भरवणारी घटना घडली आहे. महामार्गावर धावणा-या एसटी महामंडळाच्या लालपरीची म्हणजे एसटी बसची मागची दोन्ही चाकं निखळल्याने मोठी खळबळ उडाली.

निखळल्यानंतर एक चाक बसच्या पुढे आणि दुसरे चाक रस्त्याच्या बाजूला असणा-या ओढ्यात जाऊन पडले. ही बस चार चाकांवर धावत असल्याची माहिती समोर आली आहे. या बसमध्ये एकूण ३५ प्रवासी होते. मात्र, चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला आणि बसमधील ३५ प्रवासी सुखरूप बचावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावर असणा-या शेवळेवाडी परिसरात लालपरीची मागची दोन्ही चाके अचानक निखळली. त्यावेळी ही एसटी बस रस्त्यावर धावत होती. जवळपास १५ ते २० सेकंद ही बस रस्त्यावर धावत होती. त्यातील एक चाक बसच्या पुढे तर एक चाक रस्त्याच्या बाजूला ओढ्यात जाऊन पडले. बस तिरकी होऊन रस्त्यावरच धावत होती. या बसमध्ये असणा-या प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आणि बसमध्ये आरडाओरड सुरू झाली.

परळ डेपोची क्रमांक एमएच १२ बीएल ३६१८ ही बस परळवरून नारायणगावकडे निघाली होती. आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडी हद्दीत मोरडे चॉकलेट कारखान्याजवळ ही घटना घडली आहे. एसटी बसची चाकं निखळल्यामुळे बसमधील प्रवाशांना मात्र नाहक मन:स्ताप सहन करावा लागला.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या