21.5 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeक्रीडाबॉक्सर अमित पांघल-जास्मिनने पदक केले निश्चित

बॉक्सर अमित पांघल-जास्मिनने पदक केले निश्चित

एकमत ऑनलाईन

बर्मिंगहम : कॉमनवेल्थ गेम्सच्या ७ वा दिवशी भारताचे बॉक्सर्स अमित पांघल आणि महिला बॉक्सर जास्मीन यांनी आपले पदक निश्चित केले आहे. भारताने आतापर्यंत एकूण १८ पदके जिंकली आहेत.

महिलांच्या ६० किलो लाईटवेट वजनीगटात भारताच्या जास्मिनने न्यूझीलंच्या ट्रॉय गारटॉनचा ४-१ असा पराभव करत उंपात्यफेरी गाठली. तिने भारताचे बॉक्सिंगमधील अजून एक कांस्य पदक निश्चित केले. तर बॉक्सिंग ५१ किलो (फ्लायवेट) वजनीगटात भारताच्या अमित पांघलने स्कॉटलंडच्या लेनॉन मुलिगॅनचा पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. त्याने भारतासाठी कांस्य पदक पक्के केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या