27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeक्रीडाबॉक्सर जास्मिनला कांस्य, निखतनेही पदक केले निश्चित

बॉक्सर जास्मिनला कांस्य, निखतनेही पदक केले निश्चित

एकमत ऑनलाईन

बर्मिंगहम : बॉक्सर जास्मिनला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले असून बॉक्सर ५६ ते ६० किलो वजनी गटाताच्या सेमी फायनलमध्ये भारताची जास्मिन इंग्लंडच्या गेमा रिचर्डसन कडून ३-२ अशी पराभूत झाली. त्यामुळे तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. भारताने कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये आतापर्यंत २९ पदके जिंकली आहेत. यामध्ये नऊ सुवर्ण, अकरा रौप्य आणि नऊ कांस्य पदकांचा समावेश आहे.

आठव्या दिवशी प्रियांकाने महिलांच्या १०,००० मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले. त्याने ४३.३८ मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. अविनाश साबळेने पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्य पदक जिंकले. लॉन बॉल्स सांघिक प्रकारात भारतीय पुरूष संघाने रौप्य पदकाची कमाई करत इतिहास रचला. लॉन बॉल्स पुरूष सांघिकची फायनल नॉर्दन आयर्लंड आणि भारत यांच्यात झाली. नॉर्दन आयर्लंडने भारताचा १८-५ ने पराभव करत सुवर्ण पदक जिंकले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या