24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रजनतेची कामे थेट माझ्याकडे घेऊन या

जनतेची कामे थेट माझ्याकडे घेऊन या

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले आहे. या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच अनिश्चितता असते. राजकारणाचे डावपेच चालतच राहतील पण त्यामुळे राज्य कारभार थांबला आहे असे मुळीच होता कामा नये असे म्हटले आहे.

या राजकीय अस्थिरतेच्या काळात लोकांचे दैनंदिन प्रश्न आणि समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच मंत्रालयातील विविध विभागांच्या सचिवांच्या बैठकीत विविध कामांचा विस्तृत आढावा घेतला. तसेच कोरोना, पेरण्या, खतांची उपलब्धता त्याच प्रमाणे आपत्ती व्यवस्थापन तयारी, आषाढी वारीतील वारर्क­यांच्या सुविधा याविषयी महत्त्वाच्या सूचनाही केल्या. जनतेशी संबंधित महत्वाची कामे थांबवून ठेवू नका, ती थेट तातडीने माझ्याकडे घेऊन या असेही निर्देश त्यांनी दिले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या