22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeविजय माल्याला ब्रिटन भारतात पाठवणार, आज...आत्ता...ताबडतोब होणार दाखल.....

विजय माल्याला ब्रिटन भारतात पाठवणार, आज…आत्ता…ताबडतोब होणार दाखल…..

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: भारतात बँकेचे पैसे लाटून परदेशात पळालेल्या विजय माल्याच्या प्रत्यार्पणावर १४ मे रोजी यूके कोर्टानं शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर आता विजय माल्याला भारतात आणलं जाणार आहे. मुंबईत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला गेलाय. तपास यंत्रणांच्या काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माल्याचं विमान लवकरच भारतात येणार आहे. मुंबईत पोहोचल्यावर माल्याला सीबीआय ऑफिसमध्ये ठेवलं जाईल. नंतर त्याला कोर्टासमोर उपस्थित केलं जाईल.

भारतात पोहोचला तर त्याला सरळ एअरपोर्टहून कोर्टात नेलं जाईल
माल्या मुंबईत पोहोचल्यावर त्याची वैद्यकीय चाचणी केली जाईल. सीबीआय आणि ईडीचे काही अधिकारी विमानात माल्यासोबत असतील. जर माल्या दिवसा भारतात पोहोचला तर त्याला सरळ एअरपोर्टहून कोर्टात नेलं जाईल. सांगितलं जातंय की, कोर्टात सीबीआय आणि ईडी दोन्ही एजंसी त्याचा रिमांड मागतील.

ऑर्थर रोड तुरुंगातील एका सेलचा व्हिडिओ यूके कोर्टाला दाखवला होता
यूके कोर्टानं ऑगस्ट २०१८ मध्ये माल्याच्या याचिकेवर सुनावणी करत भारतीय तपास यंत्रणांना त्याला ज्या तुरुंगात ठेवणार त्याची संपूर्ण माहिती मागितली होती. जिथं प्रत्यार्पणानंतर माल्याला ठेवलं जाईल. तेव्हा तपास यंत्रणांनी मुंबईत असलेल्या ऑर्थर रोड तुरुंगातील एका सेलचा व्हिडिओ यूके कोर्टाला दाखवला होता. जिथं माल्याला भारतात आणल्यानंतर ठेवलं जाईल. एजंसींनी तेव्हा यूके कोर्टाला आश्वासन दिलं होतं की, माल्याला दोन मजली ऑर्थर रोड तुरुंग परिसर आतून खूप सुरक्षित बॅरकमध्ये ठेवलं जाईल.

Read More  धक्कादायक : टीव्हीचे चॅनेल बदलला म्हणून बहे येथे शाळकरी मुलाची आत्महत्या

सालेमपासून कसाबपर्यंत, सर्व जण राहिले याचे तुरुंगात
ऑर्थर रोड जेलमध्ये अंडरवर्ल्डशी निगडित अनेक कुख्यात आरोपींना म्हणजेच अबू सालेम, छोटा राजन, मुस्तफा दोसाला ठेवलं गेलं. २६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला पण खूप कडक सुरक्षेत याच जेलमध्ये ठेवलं गेलं होतं. तर शीना बोरा हत्येकांडातील आरोपी पीटर मुखर्जी आणि पंजाब नॅशनल बँकेचे १३,५०० कोटी रुपये बुडवणाऱ्या विपुल अंबानीला पण याच तुरुंगात ठेवलं गेलंय.

२ मार्च २०१६ रोजी भारत सोडून ब्रिटेनमध्ये पळून गेला होता
बंद झालेल्या किंगफिशन एअरलाईन्सचा मालक असलेल्या विजय माल्यानं देशातील १७ बँकांमधून घेतलेल्या पैशांपैकी तब्बल ९ कोटी रुपये फेडणं बाकी आहे. तो २ मार्च २०१६ रोजी भारत सोडून ब्रिटेनमध्ये पळून गेला होता. भारतीय तपास यंत्रणांनी यूके कार्टाकडे माल्याचं प्रत्यार्पण करण्याची विनंती केली होती. कोर्टात मोठा लढा दिल्यानंतर यूके कोर्टानं १४ मे रोजी माल्याच्या भारत प्रत्यार्पणाच्या

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या