31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeराष्ट्रीयखोटे, अर्धसत्य, अश्लिल माहिती प्रसारण निषिध्द - खासगी वाहिन्यांसाठी नवी नियमावली जारी

खोटे, अर्धसत्य, अश्लिल माहिती प्रसारण निषिध्द – खासगी वाहिन्यांसाठी नवी नियमावली जारी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील सर्व खासगी टीव्ही वाहिन्यांनी खोटे, अर्धसत्य, अश्लील आणि एखादी व्यक्ती किंवा समूहाप्रती अपमानजनक माहिती किंवा सामग्रीचे प्रसारण करू नये, अशा सूचना शुक्रवारी दि़ ९ ऑक्टोबर रोजी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिल्या आहेत.

मंत्रालयाने या संदर्भात सर्व वाहिन्यांना अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. रिपब्लिक टीव्हीसह इतर काही टीव्ही वाहिन्यांवर टीआरपीमध्ये फेरफार करण्याचा आरोप लागलेला असताना ही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे हे विशेष. काही दिवसांपूर्वीच सुदर्शन न्यूजच्या एका वादग्रस्त कार्यक्रमाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. टीव्ही वाहिन्यांनी केबल टेलिव्हिजन नेटवर्क (रेग्युलेशन) अ‍ॅक्ट १९९५ च्या अंतर्गत असलेल्या आचारसंहितेचे पूर्णपणे पालन करावे असे या अ‍ॅडव्हायजरीत म्हटले आहे.

काय दाखवू नये?
वाहिन्यांवरील कार्यक्रमाद्वारे अश्लील, मानहानिकारक, खोटे आणि अर्धसत्य असलेल्या गोष्टी प्रसारित होऊ नये अशी अपेक्षा आहे. शिवाय एखादी व्यक्ती, समूह, समाजातील वर्ग, जनता किंवा देशाच्या नैतिक जीवनावर टीका करणे, लांछन लावणे किंवा अपमानीत करणा-या गोष्टी दाखवल्या जाऊ नयेत.

टीआरपीप्रकरणामुळे महत्वपूर्ण निर्णय
मुंबई पोलिसांनी टीआरपीमध्ये फेरफार केल्याचा खळबळजनक खुलासा केल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची ही अ‍ॅडव्हायजरी जारी झाली आहे. इंडिया टुडे टीव्ही वाहिनीसह काही वृत्तवाहिन्यांविरोधात टीआरपीमध्ये फेरफार करण्याबाबतच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. यावरून सदर अ‍ॅडव्हायझरी महत्वाची मानली जात आहे.

महिला अत्याचाराबाबत राज्यकर्त्यांचे कान बधिर झालेत का?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या