24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयसाप चावल्याने बीएसएफ जवानाचा मृत्यू

साप चावल्याने बीएसएफ जवानाचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

पालघर : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील क-हे गावचे सुपुत्र महेश रामा फडवळे या जवानाला वीरमरण आले आहे. पंजाब प्रांतातील पाकिस्तान सीमेवर कर्तव्य बजावत असणा-या महेश रामा फडवळे यांना वीरमरण आले आहे. महेश रामा पडवले यांचं पार्थिव रात्री मुंबईत आल्यानंतर आज (६ जून) त्यांच्यावर क-हे या मूळगावी या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

पठाणकोटमधील बीएसएफचे इठ मुख्यालय ५८ माधोपूर जवळ थारियाल गावात महेश रामा फडवले हे २०१९ पासून भाड्याच्या घरी राहत होते. ५ जून रोजी कर्तव्य बजावत असताना जवान महेश फडवळे यांच्या डाव्या हाताला साप चावला होता.

या घटनेची माहिती मिळताच एक रुग्णवाहिका आणि नर्सिंग असिस्टंटला त्याच्या घरी पाठवण्यात आले. महेश फडवळे यांना पठाणकोटच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तातडीने हलवण्यात आले. त्यानंतर लगेच महेश फडवळे यांच्या पत्नी श्रीमती परमिला पडवले यांनी या प्रकरणाची माहिती देण्यात आली.

पठाणकोटच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. परंतु उपचारा दरम्यान काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांच्या पश्चात वडील रामा फडवळे, आई रख्मी फडवळे, पतनी परमिला फडवळे आणि मुलगी नॅन्सी फडवळे असा परिवार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या