27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रअनिल परब यांच्या रिसॉर्टवर लवकरच बुलडोझर? ; पर्यावरण विभागाने मागवल्या निविदा

अनिल परब यांच्या रिसॉर्टवर लवकरच बुलडोझर? ; पर्यावरण विभागाने मागवल्या निविदा

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना नेते माजी परीवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्टवर लवकरच कारवाई होणार असे ट्विट काल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले होते. आज या दोन याचिकांवर सुनावणी होण्याची शक्यताही आहे. अशातच पर्यावरण विभागाकडून बांधकामातील अनियमितते प्रकरणी रिसॉर्ट पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्याचबरोबर चिपळूणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एक निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निविदेमद्धे येत्या २ सप्टेंबरपर्यंत रिसॉर्ट पाडण्यासाठी कंत्राटदारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या काही महिन्यांपासून अनिल परब यांच्या दापोली रिसॉर्ट प्रकरण लावून धरलेले होते. त्यावरती अखेर पर्यावरण मंत्रालयाकडून कारवाई करण्यात येत आहे.

शिवसेना नेते माजी परीवहन मंत्री अनिल परब यांनी २०१७ मध्ये दापोली जवळ जमीन विकत घेतली होती, मात्र त्याचं रजिस्ट्रेशन दोन वर्षानंतर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. ही शेतजमीन असून सरकारी अधिका-यांच्या मदतीने ती नॉन अग्रीकल्चर करण्यात आलं असल्याच म्हटलं जात आहे. रिसॉर्टचे बांधकाम करताना उफे नियमांचं उल्लंघन केल्याचाही आरोप अनिल परब यांच्यावर करण्यात आला आहे. मुरूड ग्रामपंचायतीने ही गोष्ट मान्य केली आहे, असा दावा पर्यावरण मंत्रालयाने केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या