37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeक्रीडाआयपीएलमध्ये बुमराहची सर्वोत्कृष्ट कामगिरी

आयपीएलमध्ये बुमराहची सर्वोत्कृष्ट कामगिरी

एकमत ऑनलाईन

मुंबई : जसप्रीत बुमराहच्या भेदक मा-यापुढे कोलकात्याच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. कोलकाताविरोधात जसप्रीत बुमराह लयीत दिसत होता. बुमराहच्या गोलंदाजीपुढे कोलकात्याच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. बुमराहने आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. त्याने आयपीएलमध्ये पहिल्यांदाच पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला. कोलकाताविरोधात बुमराहने ४ षटकात फक्त १० धावा खर्च करत पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

बुमराहने एक षटक निर्धाव टाकले, तर अखेरच्या षटकात फक्त एक धाव दिली. बुमराहने पहिल्यापासूनच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत कोलकात्याच्या फलंदाजांना बांधून ठेवले. बुमराहने नीतीश राणा, आंद्रे रसेल, शेल्डॉन जॅक्सन, पॅट कमिन्स आणि सुनिल नारायण यांना बाद केले. बुमराहच्या दुस-या स्पेल आधी कोलकाता सुस्थितीत होता. म्हणजेच कोलकाता तीन बाद १३६ अशा सुस्थितीत होता. पण नंतर बुमराहने भेदक मारा करत कोलकात्याच्या फलंदाजांना बाद केले. सामन्याच्या अखेर कोलकाताची स्थिती ९ बाद १६५ झाली.

बुमराहने आयपीएलच्या इतिहासातील आपली सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. अल्जारी जोसेपने १२ धावांत सहा विकेट घेतल्या होत्या. सोहल तन्वीरने १४ धावांत ६ विकेट घेतल्या होत्या, तर अ‍ॅडम झम्पानेही १९ धावा देत ६ विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर अनिल कुंबळेने पाच धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेतल्या होता. आता बुमराहने या पंक्तीत स्थान पटकावले आहे. बुमराहने दहा धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेतल्या आहेत. अनिल कुंबळेनंतर बुमराह सर्वोत्कृष्ट दुसरा बॉलर ठरला आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या