25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रनर्मदा नदीत बस कोसळली, १३ प्रवासी ठार, अद्याप १२ बेपत्ता

नर्मदा नदीत बस कोसळली, १३ प्रवासी ठार, अद्याप १२ बेपत्ता

एकमत ऑनलाईन

भोपाळ : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील खलघाट येथे सोमवारी मोठी दुर्घटना घडली. इंदूरहून जळगाव जिल्ह्यातील अंमळनेरकडे येत असलेली राज्य परिवहन महामंडळाची अंमळनेर आगाराची बस प्रवाशांसह नर्मदा नदीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला. सकाळी १० च्या सुमारास हा अपघात झाला. तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना झाली. बसमध्ये महिला, लहान मुलांसह ५० हून अधिक प्रवासी होते. यातील १५ जणांना वाचविण्यात यश आले. मात्र, अजूनही १० ते १२ प्रवासी बेपत्ता आहेत. येथे बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी संवाद साधला. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत जाहीर केली.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची अंमळनेर आगाराची बस (क्र. एमएच ४० एन ९८४८) सोमवारी सकाळी ७.३० च्या सुमारास इंदूूरहून अंमळनेरकडे निघाली होती. ही बस धार जिल्ह्यातील खलघाट परिसरात असताना अचानक एसटी बसचा तांत्रिक बिघाड झाला आणि ही बस कठडा तोडून २५ फूट खोल नर्मदा नदीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत बसमधील १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात यश आल्याचे मध्य प्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले. आणखी १२ जण अद्याप बेपत्ता आहेत. दरम्यान, या घटनेचे वृत्त समजताच भाजप नेते गिरीश महाजन घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही थेट मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी संवाद साधून अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे आवाहन केले. दरम्यान, मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत
एसटी महामंडळाची बस बुडून झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी १० लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले. या अपघाताच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे आणि तेथील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिका-यांना दिले.

नियंत्रण कक्ष स्थापन
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहितीदेखील जळगाव जिल्हाधिका-यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. या नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२५७२२२३१८० आणि ०२५७२२१७१९३ असा आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या