काठमांडू : नेपाळमध्ये बस उलटून झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला, तर २० पेक्षा जास्त गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना मध्य नेपाळमधील कावरेपाल्चोक जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी घडली.
कावरेपाल्चोकच्या एसपींनी याबाबत माहिती दिली. कावरेपाल्चोक एसपींनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६.३० च्या सुमारास एका धार्मिक कार्यक्रमातून लोकांना घेऊन जाणा-या बसचा अपघात झाला. या अपघातात २० जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली. या घटनेचे वृत्त समजताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी अपघातग्रस्तांना बाहेर काढले आणि पोलिसांनी त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनीही तात्काळ सुविधा उपलब्ध करून जखमींवर उपचार सुरू केले.