27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमहाराष्ट्रपण कानात सांगितलेच...; माईक,चिठ्ठी प्रकरणानंतर फडणवीस सावध

पण कानात सांगितलेच…; माईक,चिठ्ठी प्रकरणानंतर फडणवीस सावध

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुख्यमंत्र्यांसोबतच्या पत्रकार परिषदेत माईक ओढून घेणे आणि चिठ्ठी देणे या प्रकारावरून टीका झाल्यानंतर पुन्हा असे होऊ नये याची खबरदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेण्यात येत असल्याचे आजच्या पत्रकार परिषदेत दिसले.

दोन माईक ठेवलेले आहेत आणि कोणतीही चिठ्ठी नाही, असे पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले खरे पण एका निर्णयाबाबत माहिती सांगण्यास विसरल्यानंतर फडणवीस यांनी शिंदेंना कानात सांगत आठवण करून दिली.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना शिंदेंसमोरचा माईक ओढून घेतला होता. त्यावरून बरीच टीका झाली होती. हा मुख्यमंत्र्यांचा अपमान असल्याचा आक्षेप विरोधी पक्षांकडून घेण्यात आला होता. खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर टीका केली होती.

माईक ओढण्याच्या प्रकारानंतर दुस-या एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असताना देवेंद्र फडणवीसांनी चिठ्ठीवर मजकूर लिहून शिंदेंसमोर चिठ्ठी सरकवली होती. यावरूनही टीका होत आहे. या टीकेच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस सावध झाले असून शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दोन माईक ठेवण्यात आले होते. तसेच कोणतीही चिठ्ठी नाही असे फडणवीसांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले.

आजच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी माईक न ओढण्याची खबरदारी घेतली असली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास विभागाच्या एका निर्णयाबाबत माहिती सांगण्यास विसरल्यानंतर त्यांनी शिंदे यांना कानात सांगत याबाबतची आठवण करून दिल्याचे पाहायला मिळाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या