24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Home....पण राज्य सरकार प्रवाशी आणण्यात अपयशी ठरलं : रेल्वेमंत्री

….पण राज्य सरकार प्रवाशी आणण्यात अपयशी ठरलं : रेल्वेमंत्री

एकमत ऑनलाईन

महाराष्ट्राने 145 रेल्वे मागितल्या, आम्ही रातोरात दिल्या-पियुष गोयल

नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकार आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यामध्ये रंगलेलं ट्विटर युद्ध चांगलंच पेटलं आहे ‘महाराष्ट्र सरकारने काल (25 मे) रात्री 8 वाजेच्या सुमारास अचानक 145 ट्रेन मागितल्या. मात्र, ते प्रवाशी आणण्यात अपयशी ठरले. त्यामुळे ट्रेन परत आल्या’, असं रेल्वे मंत्री पियुष गोयल म्हणाले आहेत

‘महाराष्ट्र सरकारने जेवढ्या ट्रेन मागितल्या तितक्या आम्ही दिल्या. मात्र, ट्रेन प्रवाशांशिवाय परत आल्या. कारण ते प्रवाशाची आणू शकले नाहीत. महाराष्ट्र सरकारने काल (25 मे) संध्याकाळी अचानक 145 ट्रेन मागितल्या होत्या. रात्रभरात 145 ट्रेनची सुविधा करणं सोप्प नाही. मात्र, तरीही रात्रभर बसून आम्ही नियोजन केलं. आम्ही 145 ट्रेन महाराष्ट्रात पाठवल्या. मात्र, प्रवाशी नसल्यामुळे त्या परत आल्या’, असं पियुष गोयल म्हणाले.

Read More  मुंबईकर जेमिमा झाली ‘रॉकस्टार’ : बीसीसीआयने व्हीडीओ केला शेअर

’80 ट्रेन मागितल्या तर 30 ते 40 ट्रेन मिळतात, असा आरोप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी का केला? हे मला कळत नाही. त्यांनी जितक्या ट्रेन मागितल्या तितक्या आम्ही दिल्या. त्यातही 65 ट्रेनमध्ये प्रवाशी नव्हते म्हणून परत गेल्या. ते प्रवाशीच आणू शकले नाहीत’, असं पियुष गोयल यांनी सांगितलं आहे.

‘केंद्र सरकारने नागरिकांच्या मदतीसाठी शक्य तितकी पावलं उचलली आहेत. देशभरातील लाखो कामगारांना भारतीय रेल्वेने सुरक्षित त्यांच्या घरी पोहोचवले आहे’ असं पियुष गोयल म्हणाले. ‘जे आमच्यावर बोट दाखवतात त्यांना समजलं पाहिजे की ते काहीही सांगितल आणि ते लोक मान्य करतील? लोक खोटं ऐकतही नाही आणि मानतही नाही’ असा टोला पियुष गोयल यांनी लगावला.

’26 मे पर्यंत भारतीय रेल्वेने प्रवासी कामगारांसाठी 3 हजार 274 श्रमिक स्पेशल ट्रेन सोडल्या आहेत. त्यात 44 लाखांहून अधिक प्रवाशांना त्यांच्या घरी सुखरुप पाठवण्यात आले आहेत’ असं पियुष गोयल यांनी सांगितल. ‘मजुरांना प्रवासादरम्यान 74 लाखांपेक्षा अधिकचे निशुल्क जेवण आणि 1 कोटी रुपयांहून अधिक पाण्याच्या बाटल्या रेल्वे उपलब्ध केल्या आहेत’, अशीदेखील माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या