28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeसोलापूरसोलापूर जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतींचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

सोलापूर जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतींचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

एकमत ऑनलाईन

सोलापूर : जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतींचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ४८ जागासाठी ५ जून रोजी मतदान होणार आहे. १३ मे पासून निवडणूकीची प्रक्रिया चालू होणार आहे. यात अक्कलकोट तालुक्यातील सर्वाधिक १४ ग्राममपंचायतीचा पोटनिवडणूकीमध्ये समावेश आहे.

शुक्रवार, १३ मेपासून निवडणूक कार्यक्रमाला सुरवात होणार आहे. १३ मेपासून उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे. अकरा तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होणार आहेत. ४८ जागासाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. अक्कलकोट तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीमधील १४ सदस्यांसाठी निवडणूक होत आहे.

करमाळा तालुक्यातील २ ग्रामपंचायतच्या दोन सदस्यांसाठी, माढामधील दोन ग्रामपंचायतच्या २ जागांसाठी, बार्शीमधील ५ ग्रामपंचायतच्या ५ जागांसाठी, उत्तर सोलापूर तालुक्यातील एक ग्रामपंचायतच्या १ जागेसाठी, मोहोळमधील २ ग्रामपंचायतच्या ३ जागांसाठी, पंढरपूरमधील २ ग्रामपंचायतच्या दोन जागांसाठी, माळशिरसच्या ५ ग्रामपंचायतच्या ७ जागांसाठी, सांगोल्यातील १ ग्रामपंचायतच्या १ जागेसाठी, मंढळवेढामधील ३ ग्रामपंचायतच्या ३ जागांसाठी, दक्षिण सोलापूर मधील ५ ग्रामपंचायतच्या ८ जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.

असा असणार कार्यक्रम
१३ ते २० मे : अर्ज विक्री व स्वीकृती
२३ मे, दुपारी ३ पर्यंत : प्राप्त अर्जांची छाननी
२५ मे : अर्ज मागे घेण्याचा अंतीम दिवस
२५ मे : दुपारी तीन पर्यंत : उमेदवारांची अंतीम यादी चिन्हासह प्रसिद्धी
५ जून : मतदान आणि मतमोजणी

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या