22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeक्रीडाटेनिसस्टार फेडररने केली निवृत्तीची घोषणा

टेनिसस्टार फेडररने केली निवृत्तीची घोषणा

एकमत ऑनलाईन

मुंबई : स्वित्झर्लंडचा महान टेनिसस्टार रॉजर फेडररने आज व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे फेडररच्या पुनरागमनाकडे डोळे लावून बसलेल्या कोट्यवधी चाहत्यांना धक्का बसला. गेले अनेक महिने फेडरर दुखापतीमुळे टेनिसपासून लांब होता. गेल्या ३ वर्षात त्याच्या गुडघ्यावर ३ वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण पुढच्या वर्षी तो ग्रँडस्लॅममध्ये कमबॅक करेल, असे अनेकांना वाटले. मात्र आज वयाच्या ४१ व्या वर्षी त्याने निवृत्ती जाहीर केली. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्याने ही माहिती दिली.

रॉजर फेडररने आपल्या आजवरच्या कारकिर्दीत २० ग्रँडस्लॅम विजेतेपदे पटकावली आहेत. नदाब आणि ज्योकोविच पाठोपाठ सर्वाधिक विजेतेपदांच्या यादीत तो सध्या तिस-या क्रमांकावर होता. पण पुरुष एकेरीत सर्वाधिक विजेतेपदांच्या शर्यतीत फेडरर अनेक वर्ष आघाडीवर होता. विम्बल्डनच्या ग्रास कोर्टवर तर त्याने अनेक वर्ष अधिराज्य गाजवलें होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या