28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रपितृपंधरवड्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबला?

पितृपंधरवड्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबला?

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातल्या अभूतपूर्व आणि नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर जवळपास महिन्याभराने मंत्रिमंडळ विस्तार झाला. पण तोही पहिल्याच टप्प्यातला. अजून दुस-या टप्प्यातला विस्तार बाकी आहे. आता सरकारला दोन-अडीच महिने पूर्ण होऊनही खोळंबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे सरकारला टीकेचा धनी व्हायला लागत आहे. अशात आता मंत्रिमंडळ विस्तार न होण्यामागे पितृपक्षाचे कारण सांगितले जात आहे.

गणेशोत्सवात मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक मंत्र्यांनी गणपतीचे दर्शन घेतले. गणेशोत्सवामध्ये ठिकठिकाणी दौरे केले. त्यानंतर तरी आता नवे मंत्री कामाला सुरुवात करतील, अशी अपेक्षा त्यांच्याकडून होती. मात्र त्यासाठी आता जनतेला आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसत आहे. १३ मंत्र्यांनी अजूनही आपल्या खात्याचा पदभार स्वीकारलेला नाही. यामागे पितृपक्ष हे कारण असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

पितृपंधरवड्याच्या धास्तीने १८ पैकी १३ मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नसल्याची माहिती सामच्या सूत्रांनी दिली आहे. विस्तार २४ ऑगस्टला झाला आहे. मात्र अनेक मंत्र्यांनी अजूनही कारभार स्वीकारलेला नाही. यामागे गणेशोत्सव हेदेखील एक कारण सांगितले जात आहे. गणेशोत्सवाच्या काळात अनेक मंत्री आपल्या मतदारसंघात, गावी होते, दौ-यांवर होते. या सगळ्यामध्ये त्यांचा वेळ गेल्याने काम सुरू करण्यास वेळ लागत आहे.

शिवाय या मंत्र्यांची दालने अद्याप धूळ खात पडली आहेत. त्यांच्या नूतनीकरणाचे काम अजून शिल्लक आहे. यामुळेही हे मंत्री अद्याप मंत्रालयातल्या आपल्या कक्षात गेले नाहीत, असे सांगितले जात आहे. तर आता गणपती संपल्यावर लगेचच पितृपंधरवडा सुरू झाला आहे. हा काळ अशुभ असल्याचे मानले जाते. त्यामुळे आता मंत्री पदभार स्वीकारत नसल्याची चर्चा आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या