24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रएका बाजूने शिव्या द्यायच्या आणि दुस-या बाजूने समेटाची हाक : एकनाथ शिंदे

एका बाजूने शिव्या द्यायच्या आणि दुस-या बाजूने समेटाची हाक : एकनाथ शिंदे

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसैनिकांनो, परत फिरा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेलं आवाहन बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी फेटाळलं आहे. हे आवाहन फेटाळताना त्यांनी मुख्यमंत्री तसेच आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

एका बाजूने शिवसैनिकांना डुकरं, नाल्याची घाण, कुत्रे, मृतदेह म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने हिंदूविरोधी महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी समेटाची हाक द्यायची याचा अर्थ काय असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?
एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं,नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा. तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआ सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची,याचा अर्थ काय?

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या